
अकोला अकोला येथील खाण आणि क्रशर उद्योग संघाने अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्योजकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी आणि एका उद्योजकाचा फोन कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता.
नियमानुसार रॉयल्टी भरत असतानाही अधिकाऱ्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जाते आणि धमकावले जात आहे, असा आरोप उद्योजकांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं होतं. या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती.
