
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर शेळके यांची कार आणि ट्रकच्या भयंकर अपघातात पत्नीसह त्यांचा मृत्यू झाला. हा खरोखर अपघात आहे की घातपात आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच डॉ. जितेंद्र शेळके यांच्या अपघात प्रकरणातील चालक पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. शनिवारी दुपारी कंटनेर चालक पोलीस चौकशीसाठी हजर झाला आहे. या प्रकरणात आपली काहीच चूक नसून मी हळूहळू गाडी चालवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
डॉ. जितेंद्र शेळके यांचा पत्नीसह समृद्धी मगामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात विविध चर्चा सुरू असताना डॉ. शेळके ज्या कंटनेरला जाऊन धडकले, त्या चालकाला चौकशीसाठी आज पोलिसांनी बोलावून घेतले. त्यावेळी चालकाने आपला जबाब नोंदवला.
