
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून कार्यकर्ते गावोगावी फिरून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मविआचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी विरोधकांवर टीका करत स्वतःच्या विजयाचा ठाम दावा केलाय. मुलीच्या प्रकरणाचाही मुद्दा उपस्थित करत त्यांनी सहानुभूतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
ही काही अनुकंपाची नोकरी आहे का की घरातील कुणी गेल्यावरती तिला पुन्हा नोकरी लागू शकते, रडून निवडणुका जिंकता येत नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी कर्तृत्वावरच जनता निर्णय घेईल, असा विश्वास मविआचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी व्यक्त केला.
